कालमापन( दिनदर्शिका )
* वर्षाचे 12 महिने असतात.
* जानेवारी (31), फेब्रुवारी(28/29), मार्च (31),एप्रिल(30), मे(31), जून(30), जुलै (31), ऑगस्ट(31), सप्टेंबर(30), ऑक्टोबर (31) नोव्हेंबर(30), डिसेंबर(31)
* सामान्य वर्षाचे एकूण दिवस 365 असतात. * ज्या इसवी सनाला 4 ने निःशेष भाग जातो त्या वर्षास लीप वर्ष म्हणतात. उदा.1992,1996,2000 2004,2008
* लीप वर्षाचे एकूण 366 दिवस असतात. लीप वर्षात एकूण 52 आठवडे व 2 दिवस असतात
* लीप वर्षात फेब्रुवारी चे दिवस 29 असतात. * जे लीप वर्ष नाही त्या वर्षी स्वातंत्र्यदिनी जो वार असतो त्याच्या लगतचा पुढचा वार त्याच वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी असतो.
* एकाच वर्षाचे स्वातंत्र्यदिन, टिळक पुण्यतिथी, बालदिन,व शिक्षक दिन एकाच वारी येतात व महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
* 28 दिवसांच्या महिन्यात सर्व वार चार-चार वेळा येतात.
* 29 दिवसाच्या महिन्यात फक्त 1 तारखेचा वार पाच वेळा येतो.
* 30 दिवसाच्या महिन्यात फक्त 1 व 2 तारखेचा वार पाच वेळा येतो.
* 31 दिवसांच्या महिन्यात फक्त 1, 2 व 3 तारखेचा वार 5 वेळा येतो.