Skip to main content

Posts

Showing posts with the label म्हणी

मराठी म्हणी mhani in marathi proverbs in marathi

मराठी म्हणी mhani in marathi proverbs in marathi अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.  अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपण नुकसानकारक ठरते. आयत्या बिळात नागोबा - दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वत: साठी करुन घेणे.  आगीतून फुफाट्यात - लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.  अंथरून पाहून पाय पसरावे - ऐपतीच्या मानाने खर्च करणे. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक फायदा होणे. इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता वाटेल ते बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार - अंगी गुण थोडा असणारा बढाई मारतो. एका हाताने टाळी वाजत नाही - भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची - मौन पाळून अब्रू राखणे. कर नाही त्याला डर कशाला?- निरपराधी माणूस निर्भय असतो.    कामापुरता मामा - काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती. नमनाला घडाभर तेल - एखादी गोष्ट सुरू करायला फार वेळ लागणे. नव्याचे नऊ दिवस - एखादी वस्तू नवीन असे तोवर तिचे कोडकौतुक करणे. नवी विटी नवे राज्...