Skip to main content

मराठी म्हणी mhani in marathi proverbs in marathi

मराठी म्हणी mhani in marathi
मराठी म्हणी mhani in marathi proverbs in marathi
  • अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो.
  •  अति शहाणा त्याचा बैल रिकामा - अति शहाणपण नुकसानकारक ठरते.
  • आयत्या बिळात नागोबा - दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वत: साठी करुन घेणे. 
  • आगीतून फुफाट्यात - लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे. 
  • अंथरून पाहून पाय पसरावे - ऐपतीच्या मानाने खर्च करणे.
  • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक फायदा होणे.
  • इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.
  • उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता वाटेल ते बोलणे.
  • उथळ पाण्याला खळखळाट फार - अंगी गुण थोडा असणारा बढाई मारतो.
  • एका हाताने टाळी वाजत नाही - भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाही.
  • झाकली मूठ सव्वा लाखाची - मौन पाळून अब्रू राखणे.
  • कर नाही त्याला डर कशाला?- निरपराधी माणूस निर्भय असतो.   
  • कामापुरता मामा - काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती.
  • नमनाला घडाभर तेल - एखादी गोष्ट सुरू करायला फार वेळ लागणे.
  • नव्याचे नऊ दिवस - एखादी वस्तू नवीन असे तोवर तिचे कोडकौतुक करणे.
  • नवी विटी नवे राज्य -  सगळाच प्रकार नवीन सुरू करणे.
  • नाव मोठे लक्षण खोटे -  भपका मोठा पण प्रत्यक्षात वागणूक ढोंगीपणाची.
  • नाचता येईना अंगण वाकडे - आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
  • नाक दाबले की तोंड उघडते -  मर्मावर आघात केल्याशिवाय वठणीवर येत नाही.
  • नाकापेक्षा मोती जड -  कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्त्व येणे.
  • नावडतीचे मीठ अळणी -  नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्टदेखील वाईटच दिसते.
  • पाचामुखी परमेश्वर -  पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे.
  • पालथ्या घागरीवर पाणी - केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे.
  • पायातली वहाण पायीच बरी -  प्रत्येकाला त्याची योग्यता असेल अशा बेतानेच वागावे.
  • पुढच्यास ठेच, मागचा शहाणा -  दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे.
  • पाचही बोटे सारखी नसतात - सर्वच व्यक्ती समान स्वभावाची किंवा योग्यतेची नसतात.
  • प्रयत्नांती परमेश्वर -  कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांती साध्य होते.
  • बैल गेला नि झोपा केला -  एखादी गोष्ट टळून गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
  • बुडत्याचा पाय खोलात -  माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती सर्व बाजूंनी होऊ लागते.
  • भित्यापाठी ब्रह्मराक्षस -  भित्र्या व्यक्तीवर अनेक संकटे कोसळतात.
  • भरवशाच्या म्हशीला टोणगा  - ज्याच्याकडे खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे.
  • भीड भिकेची बहीण -  भिडस्तपणा माणसाचे मोठे नुकसान करतो.
  • भीक नको पण कुत्रा आवर -  ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता, उलट संकट ओढवणे.
  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये -  एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
  • मन चिंती ते वैरी न चिंती -  आपल्या मनात जेवढ्या वाईट गोष्टी येतात तेवढ्या शत्रूच्या मनात येत नसतात.
  • मेल्या म्हशीला मणभर दूध -  मेलेल्या माणसाची खूप स्तुती करणे.
  • मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते - मुख्य व्यक्ती वागेल तसे वागणे.
  • मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? - धोका पत्करायला कोणीही पुढे येत नाही. 
  • माकडाच्या हातात कोलीत - मूर्खाला नको ते अधिकार देणे.
  • वासरांत लंगडी गाय शहाणी - अज्ञानी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते.
  • वळणाचे पाणी वळणानेच जाणार - निसर्गनियमाने सर्व गोष्टी होतात.
  • विनाशकाले विपरीत बुद्धी - विनाशकाल आला म्हणजे मनुष्याची बुद्धी फिरते.
  • रात्र थोडी सोंगे फार - कामे पुष्कळ, पण ती पार पाडायला वेळ न पुरणे.
  • चोराच्या मनात चांदणे - वाईट काम करणार्‍याच्या मनात भीती असते.
  • घरोघरी मातीच्या चुली - सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.
  • गाढवाला गुळाची चव काय? - मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
  • गोगलगाय नि पोटात पाय - एखाद्या चे खरे स्वरूप न दिसणे.
  • दुरून डोंगर साजरे - दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींचं खरे स्वरूप लक्षात येत नाही.
  • दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ - दोघांच्या वादात तिसऱ्या व्यक्तीच्या फायदा होतो.
  • काखेत कळसा गावाला वळसा - हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे.
  • कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ - आपल्याच नात्यातला आपला घात करतो.
  • कोल्हा काकडीला राजी - शूद्र माणसे शुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात.
  • गर्वाचे घर खाली - घमेंडखोर माणसावर नाचक्कीची वेळ येते.
  • गरज सरो वैद्य मरो - गरज संपल्यावर उपकार कर्त्याला विसरणे.
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही.
  • पळसाला पाने तीनच - कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच.
  • हातच्या काकणाला आरसा कशाला? - प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते.

Popular posts from this blog

इ.सातवी पाठ 1.इतिहासाची साधने ( स्वाध्याय )

       तुळजाभवानी प्राथमिक विद्यामंदिर तुळजापूर इयत्ता : सातवी  विषय : इतिहास पाठ 1.इतिहासाची साधने ( स्वाध्याय )    विद्यार्थ्याचे नाव : -----------------------------------हजेरी क्र. निर्मिती : श्री.संसारे एम्.के --------------------------------------------------------------------- प्रश्न 1.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. भौतिक साधनांची नावे लिहा?                      -------------------------------------------------------------------- 2.लिखित साधनांची नावे लिहा? --------------------------------------------------------------------- 3.मौखिक साधनांची नावे लिहा? -------------------------------------------------------------------- 4.इतिहास म्हणजे काय? --------------------------------------------------------------------- 5.इतिहासाची साधने कशाला म्हणतात? --------------------------------------------------------------------- 6.ताम्रपट म्हणजे काय? ----------------------------------------...
Compound Interest Calculator Compound Interest Calculator Principal Amount: $ Annual Interest Rate: Number of Years: Total: $