७..स्वराज्याचा कारभार
शिवाजी महाराजांची स्थापना केली.स्वत:स राज्याभिषेक करवून घेतला. राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. स्वराज्याचा विस्तार झाला. स्वराज्यात महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्ह्यातील बराचसा प्रदेश अंतर्भूत होता तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यातील काही भाग स्वराज्यात समाविष्ट झालेला होता. विस्तारत गेलेल्या स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा,त्यामध्ये लोकांचे कल्याण साधले जावे, यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली.
आज आपण स्वराज्याचा कारभार या पाठातील अष्टप्रधानमंडळ, शेतीविषयीचे धोरण, तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण, व्यापार व उद्योग, लष्करी व्यवस्था, किल्ले, सागरी किल्ले, आरमार इत्यादी घटकावर आधारित Online test सोडवूया.