- खरी कला ही आत्म्याचा अविष्कर असते.
- जेव्हा पैसा बोलू लागतो तेव्हा सत्य चूप बसते.
- वारे, लाटा नेहमी शुरांना मदत करतात.
- खऱ्या मित्राची परीक्षा संकटाच्या वेळी येते.
- विचार कुठूनही घ्यावेत पण ते घेताना पारखून घ्यावेत.
- ज्ञानाचे अंतिम लक्ष्य सुंदर चारित्र्य निर्माण होणे हेच असले पाहिजे.
- मानवी जीवन हे भावी अस्तित्वाच्या आशेने उजळले पाहिजे.
- अनुभव हाच जीवनाचा खरा शिक्षक आहे.
- इतिहास अभ्यासत बसण्यापेक्षा इतिहास घडविणे अधिक चांगले.
- सत्याच्या प्रतिष्ठेसाठी असत्याचा विध्वंस करावा लागतो.
- जेव्हा अहंकार नष्ट होतो तेव्हाच आत्मा जागृत होतो.
- असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगुर असतो.
- खरा आनंद दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
- प्रसन्नता ही आत्म्याची शक्ती आहे.
- कोणताही भार आनंदाने उचलला की तो हलका होतो.
- अहंकारी माणसाला दुसऱ्याचा अहंकार सहन होत नाही.
- आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.
- प्रसन्नता सर्व सद्गुणांची जननी आहे, आनंदी मनुष्य दीर्घायुषी असतो.
- अनेक दुःख समूहांचे नाव 'आळस' आहे.
- सुंदर चारित्र्य ही सर्व कलांमध्ये सुंदर कला आहे.
- सर्व कलांमध्ये 'जीवन जगण्याची कला' ही श्रेष्ठ कला आहे.
- किर्ती येथे तेव्हा स्मृति अदृश्य होते.
- श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानवंत व गुणवंत होण्याचा प्रयत्न करावा.
- लोभी मनुष्याला कोणी मित्र असत नाही किंवा कोणी गुरू ही असत नाही.
- अश्रूंनी हृदय कळतात आणि मिळतात.
- धैर्यहीन मनुष्य तेलहिन दिव्या सारखा असतो.
- ध्येयासाठी जगणे ध्येयासाठी मरण्यापेक्षा ही कठीण आहे.
- नम्रतेने मूळे अभिमान ही वितळून जातो.
- सर्व सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे नम्रता.
- धाडसी लोकांना नशीब साथ देत असते.
- मनुष्य स्वतःच स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे.
- पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो.
- समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाही.
- शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
- दुःख भोगल्याने सुखाची किंमत समजते.
- मनुष्य आपले दुःख हसून घालवितो पण रडून वाढवितो.
- पराक्रमाचा अभिमान असावा पण उन्माद नसावा.
- जो मनुष्य खोटे बोलायला घाबरतो, तो इतर कशालाच घाबरत नाही.
- मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे.
Educational blog, online Gk test, Maharashtra teacher blog, online Gk test in marathi,